लोणावळ्यापासून अगदी पाच किलोमीटरवर असलेलं खंडाळा देखील एक छान पर्यटन स्थळ आहे. उन्हाळ्यात थंडाव्यासाठी आणि पावसाळ्यात गिर्यारोहणासाठी या ठिकाणांना पर्यटक भेट देतात.



पुण्यापासून जवळ असलेल्या ठिकाणांमध्ये लोणावळा हे ठिकाण फारच लोकप्रिय आहे. लोणावळा हे एक थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखलं जातं. लोणावळा पुण्यापासून 150 किमीवर आहे. ज्यामुळे मुंबईहून पुण्याला जाताना लोणावळा मध्ये लागतं. लोणावळ्यामध्ये राजमाची पॉईंट, वळवण धरण, धबधबे, भुशी धरण, टायगर्स लीप, कार्ला लेणी, लोहगड, विसापूर अशी अनेक निसर्गरम्य ठिकाणं आहेत. याशिवाय या ठिकाणची चिक्की फारच प्रसिद्ध आहे.
पुण्यातील मुळा नदीवर वसलेलं सुंदर धरण म्हणजे मुळशी धरण. पुणे शहरात या धरणातील पाण्याचा पूरवठा केला जातो. सह्याद्रीच्या डोंगररांगा निसर्गरम्य घाट आणि दऱ्या, चहूबाजूने पसरलेलली हिरवळ, पक्षी आणि प्राणी पाहण्यासाठी या धरणाच्या आजुबाजूचा परिसर प्रसिद्ध आहे. या धरणासोबत कोराईगड आणि धानगडदेखील तुम्ही नक्कीच पाहू शकता. पावसाळ्यात धबधबे पाहण्यासाठी या ठिकाणाला अनेक पर्यटक भेट देतात.