पानशेत धरण (Paanshet Dam)

पुणे शहराला पाणी पूरवठा करणारं पानशेत हे एक जुनं आणि महत्त्वाचं धरण आहे. पावसाळ्यात या धरणाच्या आजूबाजूचा परिसर पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. डोंगरावर जमा झालेले ढग, गावागावातील शेतमळी, धबधबे, आहोळ पाहण्यासाठी पानशेतला जरूर भेट द्या.

खडकवासला धरण (Khadakwasla Dam)

पुणे शहरातील खडकवासला हे एक प्रमुख धरण आहे. पुणे शहराला या धरणातून पाणीपूरवठा केला जातो. पुणे शहरापासून 15 कि.मी. अंतरावर असलेल्या खडकवासला धरणाला पुण्याची चौपाटी असं म्हणतात. सिंहगडला जाताना खडकवासला धरण वाटेवरच लागते. त्यामुळे तुम्ही सिंहगडला जाणार असाल तर खडकवासला धरणालादेखील जरूर भेट द्या.

मुळशी धरण (Mulshi Dam)

पुण्यातील मुळा नदीवर वसलेलं सुंदर धरण म्हणजे मुळशी धरण. पुणे शहरात या धरणातील पाण्याचा पूरवठा केला जातो. सह्याद्रीच्या डोंगररांगा निसर्गरम्य घाट आणि दऱ्या, चहूबाजूने पसरलेलली हिरवळ, पक्षी आणि प्राणी पाहण्यासाठी या धरणाच्या आजुबाजूचा परिसर प्रसिद्ध आहे. या धरणासोबत कोराईगड आणि धानगडदेखील तुम्ही नक्कीच पाहू शकता. पावसाळ्यात धबधबे पाहण्यासाठी या ठिकाणाला अनेक पर्यटक भेट देतात.