देहू (Dehu)

पुण्यात फिरताना आळंदीसोबत देहूलादेखील जरूर जा. आळंदी आणि देहू ही भक्तीरसात भिजलेली गावं आहेत. ज्यांना संतांच्या चरित्रात रस आहे अशा लोकांनी या ठिकाणांना अवश्य भेट द्यावी. तुम्हा या दोन्ही गावांमध्ये अप्रतिम भक्तीचा अनुभव येऊ शकतो. देहू हे संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान आहे. देहूमध्ये भंडारा डोंगर आणि गाथा मंदिर पाहण्यासारखी स्थळं आहेत.

आळंदी (Alandi)

पुण्यापासून जवळ असलेल्या आळंदी गावादेखील तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता. देवाची आळंदी या नावाने आळंदी गावाची ख्याती आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी आळंदी गावात समाधी घेतली होती. आळंदी इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेलं एक गाव आहे.

मोराची चिंचोळी (Chincholi)

पुणे – अहमदनगर रोडवर शिरूर जवळ मोराची चिंचोळी हे एक छान पर्यटन स्थळ आहे. या गावात मोरांचे वास्तव्य असल्याने याला मोराची चिंचोळी असं नाव पडलं आहे. मोकळ्या वातावरणात फिरणारे मोर पाहण्यासाठी पर्यटक या गावाला भेट देतात. पावसाळ्यात मोरांचे नृत्य पाहण्याची एक वेगळाच आनंद तुम्हाला या गावात नक्कीच मिळू शकतो. शिवाय या गावांमध्ये पर्यटकांसाठी होम स्टेची व्यवस्थादेखील करण्यात येते.

ॲम्बी व्हॅली

पुणे शहराजवळ वसलेलं ॲम्बी व्हॅली हे देखील एक निसर्गरम्य छोटेखानी शहर आहे. लोणावळ्यातून तुम्ही ॲम्बी व्हॅलीला जावू शकता. अकरा हजार एकरमध्ये हे शहर वसलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही दोन ते तीन दिवस निवांतपणे राहण्यासाठी नक्कीच जाऊ शकता.

लवासा सिटी (Lavasa City)

लवासा सिटी हे पुण्यातील एक नियोजित, निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. पुण्यापासून काहीश्या अंतरावर असलेल्या लवासा सिटीची ख्याती जगभरात पसरलेली आहे. प्रशस्त हॉटेल्स आणि अत्याधुनिक सुविधांनी नटलेलं हे एक छोटंसं शहर आहे. थोडंस खर्चिक असलं तरी लवासामध्ये राहण्याचा अनुभव नक्कीच रोमांचक असू शकतो.

खंडाळा (Khandala)

लोणावळ्यापासून अगदी पाच किलोमीटरवर असलेलं खंडाळा देखील एक छान पर्यटन स्थळ आहे. उन्हाळ्यात थंडाव्यासाठी आणि पावसाळ्यात गिर्यारोहणासाठी या ठिकाणांना पर्यटक भेट देतात.

लोणावळा (Lonavla)

पुण्यापासून जवळ असलेल्या ठिकाणांमध्ये लोणावळा हे ठिकाण फारच लोकप्रिय आहे. लोणावळा हे एक थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखलं जातं. लोणावळा पुण्यापासून 150 किमीवर आहे. ज्यामुळे मुंबईहून पुण्याला जाताना लोणावळा मध्ये लागतं. लोणावळ्यामध्ये राजमाची पॉईंट, वळवण धरण, धबधबे, भुशी धरण, टायगर्स लीप, कार्ला लेणी, लोहगड, विसापूर अशी अनेक निसर्गरम्य ठिकाणं आहेत. याशिवाय या ठिकाणची चिक्की फारच प्रसिद्ध आहे.